केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा


साडेचार महिन्यांनतंर शेतकऱ्यांमध्ये समाधानम टा...

केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा
 प्रतिनिधी, जळगाव

गेल्या साडेचार महिन्यांत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाकडाउनमुळे जिल्ह्यातील केळीचा भावात घसरण आली होती. मात्र, आता सणासुदीचा काळ सुरू झाल्याने केळीला मागणी आहे. लॉकडाउनच्या तब्बल साडेचार महिन्यांनंतर जळगावात केळीला १ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे जिल्ह्यातील रावेर बाजार समितीत सोमवारी उच्चप्रतीच्या नवती केळीला प्रतिक्विंटल १ हजार ५० रुपये दर (फरक २० रुपये) मिळाला. तसेच कांदेबाग व पिलबाग केळीला ८३० रुपये प्रतिक्विंटल (फरक २० रुपये) असे ९५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फरकाची रक्कम समाविष्ट करता १ हजार रुपयांपेक्षा जास्त दराचा टप्पा तब्बल साडेचार महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर केळीने गाठला आहे. सोमवारी नवती केळीला २० रुपयांच्या फरकासह १ हजार ५० रुपये दर मिळाला. केळीला मागणी अधिक असली तरी शेतकऱ्यांकडून मात्र प्रतिक्विंटल २५० ते ३०० रुपये कमी देऊन केळीची कापणी होत असल्याने केळी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. करोनामुळे लॉकडाउनचा मोठा फटका केळी उत्पादकांना बसला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळीचे दर १ हजार ७० रुपये होते. परंतु, एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात केळीचे दर सुमारे साडेचारशे रुपयांनी घसरले होते. तेव्हा केळीला प्रतिक्विंटल ६०० रुपये एवढा दर मिळाला होता.

व्यापाऱ्यांकडून फसवणूक


यंदा कांदेबाग व पिलबाग केळीच्या दरातही ५०० रुपयांनी घट झाली होती. तेव्हापासून केळीचे दर १ हजार रुपयांपेक्षा कमीच होते. मात्र सुमारे साडेचार महिन्यानंतर आता केळीचे दर वाढले आहेत. दरम्यान, सध्या केळीला मोठी मागणी असतानाही व्यापाऱ्यांकडून पूर्ण भाव दिला जात नसल्याने केळी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. बोर्डाच्या दरांपेक्षा २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल कमी दर दिले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आह

टिप्पण्या