घरबसल्या करा गणेश मूर्तीचे दान



करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व करोना टाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

घरबसल्या करा गणेश मूर्तीचे दान
    
प्रतिनिधी, नाशिक 
करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व करोना टाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

यंदा करोना विषाणूमुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे सर्वांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी एक सप्टेंबर रोजी शहरातील विसर्जनस्थळी गर्दीमुळे करोनाबाधितांची संख्या वाढू नये, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'घरबसल्या गणेशमूर्ती दान करा, करोना टाळा' असा उपक्रम राबविण्यात येत आहे. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या घरोघरी जाऊन मूर्तींचे संकलन करणार आहेत. 
घरबसल्या मूर्ती दान करण्यासाठी विधानसभा विभागनिहाय पदाधिकारी नेमण्यात आले आहे. संबंधित विधानसभा व विभाग पदाधिकारी संकलित केलेल्या गणेश मूर्ती नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करून विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा