ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरू केलेय खरे, पण ते फक्त शहरातील विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे आहे. कोकण किंवा इतर ठिकाणच्या ग्रामीण भागातील शिक्षणासाठी ही 'ऑनलाइन शिक्षण पद्धती' खरोखरच उपयोगाची आहे काय, त्याचा घेतलेला धांडोळा. न्यूज by aniket koli करोनाच्या संकटामुळे समाजातील सर्वच व्यवस्थांची उलथापालथ झालेली आहे. त्यातील शिक्षण व्यवस्थेतील स्थित्यंतर फार महत्त्वाचे आहे. त्यातही ग्रामीण भागातील शालेय स्तरावरील शिक्षणामध्ये ज्या प्रत्यक्ष अडचणी, शाळाचालक आणि शिक्षक या दोन्ही घटकांबरोबर विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत, त्यांचा शिक्षण खात्याने गांभीर्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. हा लेख लिहिताना मुंबई-पुणे यांसारखी मोठी शहरे माझ्या डोळ्यांसमोर नाहीत. कोकणातील माझ्या करूळसारख्या छोट्या गावातील शाळेतल्या विद्यार्थ्यांचा विचार मी येथे स्वानुभवावरून मांडीत आहे. मी तेथे गेली बेचाळीस वर्षे ४०० विद्यार्थ्यांचे एक माध्यमिक विद्यालय चालवितो, त्याची श्रेणी प्रथम वर्गाची आहे. कारण मी निवडलेले शिक्षक अव्वल दर्जाचे शिक्षणाग्रही शिक्षक आहेत. ग्रामीण ...